कारवाईत पोलीसांनी वाचविले ७९ गोवंशीय जनावरांचे प्राण
----------------------------------------------------------------
अहिल्यानगर (प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी):-मा.श्री.सोमनाथ घार्गे, पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांनी बकरी ईदच्या अनुषंगाने जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशनला दिनांक ०५/०६/२०२५ रोजी १८.०० पासुन ते दिनांक ०६/०६/२०२५ रोजी ०२.०० वा. या कालावधीमध्ये ऑल आऊट ऑपरेशन राबविण्यात आदेश दिले.
१प्राणी संरक्षण कायदयान्वये दाखल केसेस
(गोवंश जनावरे) १३ केसेस जप्त मुद्देमाल एकूण ३७,०३,००/- रू किं. त्यात ७९ गोवंश जातीचे जनावरे
२ गोवंश जनावरांची कत्तल करणारे सराईत आरोपी चेंकींग ६४
३ कत्तलखाने चेकींग ३२
४ सराईत आरोपी चेकींग ११३
५ चेक पोस्ट चेकींग २३
सदरची कारवाई मा.श्री.सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा.श्री. प्रशांत खैरे, अपर पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर व मा.श्री.वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर यांचे सुचना व मार्गदर्शना खाली जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन यांनी केली आहे.


Post a Comment
0 Comments