Type Here to Get Search Results !

विविध सामाजिक संघटने कडून ॲड.अमोल सोनवणें यांचा सन्मान



श्रीरामपूर (प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी):-श्रीरामपूर - येथील विद्रोही विद्यार्थी संघटनेचे ॲड.अमोल सोनवणे यांनी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीकारी विचारातून शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ही प्रेरणा घेऊन प्रतिकूल परिस्थितीत खासदार गोविंदराव आदिक विधी महाविद्यालय श्रीरामपूर येथून लॉ चे शिक्षण पुर्ण करून लॉ ची पदवी संपादन केली या निमित्ताने विविध सामाजिक संघटने च्या वतीने सत्कार करण्यात आला.विविध सामाजिक संघटने च्या कार्यकत्यांनी ॲड.अमोल सोनवणे यांच्या कार्याचे कौतुक करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी शंभुक विद्यार्थी वसतिगृहाचे अशोकराव दिवे,बामसेफचे रमेश मकासरे, फ्रांन्सिस शेळके, सर्जेराव देवरे,भारतीय बौध्द महासभेचे सुगंध राव इंगळे,प्रकाश सावंत,के सी दाभाडे, निवृत्ती पगारे, भाऊसाहेब हिवराळे,विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे  डॉ.सलिम शेख,अकबर शेख, बहुजन वंचितचे संतोष त्रिभुवन,विजय जगताप, सुनिल वाघमारे,भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (माले) कॉंब्रेड  जीवनराव सुरुडे, परिवर्तन फाउंडेशन चे मेजर कृष्णा सरदार,संभाजी कोळगे, डॉ.संजय दुशिंग,श्रीराम ट्रेडर्स चे रामभाऊ सुगुर,कवी रज्जाक शेख,कवी आनंदा साळवे, बुध्दीस्ट इंटरनॅशनल चे सुरंजन साळवे,सक्षम फाउंडेशन चे सुशिल पठारे,अमोल मिसाळ, नामदेव शिंपी समाज पंच मंडळ श्रीरामपूर चे कैलास खंदारे,राजमुद्रा वृत्त वाहिनीचे मुख्य संपादक मुश्ताकभाई तांबोळी, सामाजिक कार्यकर्ते ॲड.राजेश बोर्डे, के टी साळवे,एफ एन वाघमारे,गौतम राउत आदिंची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वीतेसाठी संतोष त्रिभुवन, विजय जगताप,पी डी सावंत,के सी दाभाडे यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शंभुक वसतिगृहाचे अशोकराव दिवे यांनी केले तर आभार प्रदर्शन सक्षम फाउंडेशन चे सुशिल पठारे यांनी केले.

Post a Comment

0 Comments