Type Here to Get Search Results !

गोवंशीय जनावरांची कत्तल करणारी टोळी एक वर्षाकरिता हद्दपार ,पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची कारवाई



पोलीस अधीक्षक म्हणुन अहिल्यानगरचा चार्ज घेताच सलग दुसरी हद्दपारीची कारवाई 


 अहिल्यानगर (प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी):-प्रस्तृत बातमीतील हकीगत अशी की, टोळीप्रमुख अ.नं. (१) वसीम कादीर कुरेशी, वय २८ वर्ष रा. हमालवाडा,आंबेडकर चौक, झेंडीगेट, ता.जि. अहिल्यानगर हल्ली.रा. नागापुर,ता.जि.अहिल्यानगर टोळीसदस्य (२) अदिल अमीन कुरेशी, वय २०वर्ष रा. सदर बाजार,भिंगार,ता.जि.अहिल्यानगर, हल्ली रा. नागापुर, ता. जि. अहिल्यानगर व (३) शफिक नुर कुरेशी, वय ५० वर्ष रा. सदर बाजार,भिंगार,ता.जि.अहिल्यानगर, हल्ली रा. नागापुर, ता. जि. अहिल्यानगर यांनी एक गुन्हेगारी टोळी तयार करुन त्यांचे टोळीचे गुन्हेगारी अस्तित्व टिकविण्यासाठी त्यांनी अहिल्यानगर शहरातील सर्वसामान्य नागरीकांमध्ये दहशत निरतंर राहण्याकरीता गोवंशीय जनावरांची कत्तल करुन जनावरांचे मांस विक्री करण्याचे उद्देशाने जवळ बाळगणे व त्याची वाहतुक  करणे असे गुन्हे सराईतपणे केलेले असुन दिवसेंदिवस टोळीची गुंडगिरी व गुन्हेगारीवृत्ती वाढतच चालली होती. टोळीतील टोळी प्रमुख व सदस्यांनी सन २०२३ ते २०२५ मध्ये सराईतपणे केले असुन टोळीच्या गैर कृत्यास प्रतिबंध होण्यासाठी त्यांचेविरुध्द कायदेशीर कारवाई व प्रतिबंधक कारवाई करुनही त्यांचे वर्तनात सुधारणा झाली नाही. टोळीच्या सदर कृत्यामुळे सर्वसामान्य नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे टोळीने केलेल्या गुन्हयांबाबत कोणीही सर्वसामान्य नागरीक उघडपणे तक्रार, साक्ष अगर माहिती देण्यास पोलीस स्टेशनला येत नव्हते. सदर टोळीकडून भविष्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे घडणार असल्याने संपुर्ण टोळीची पांगापांग करुन हद्दपार केल्याशिवाय टोळीचे गैरकृत्यांना आळा बसणार नव्हाता तसेच अहिल्यानगर शहर व आजुबाजुच्या परिसरातील सर्वसामान्य नागरीकांच्या जिवीताचे सुरक्षिततेसाठी व टोळीची दहशत कमी करण्यासाठी व त्यांचे गैरकृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी टोळीप्रमुख व टोळी सदस्य यांचे विरुध्द सहाय्यक पोलीस निरीक्षक, एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५नुसार अहिल्यानगर जिल्हा हद्दीतुन दोन वर्षाकरीता हद्दपार करणे बाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक तथा हद्दपार प्राधिकण यांचेकडे सादर केला होता. सदर प्रस्तावाची उप विभागीय पोलीस अधिकारी, अहिल्यानगर ग्रामीण विभाग, अहिल्यानगर यांनी चौकशी करुन शिफारस अहवाल सादर केला होता.  सदर प्रस्तावाची श्री. सोमनाथ घार्गे, हद्यपार प्राधिकरण अधिकारी तथा पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी सखोल चौकशी करुन टोळीप्रमुख अ.नं. (१) वसीम कादीर कुरेशी, वय २८वर्ष रा. हमालवाडा,आंबेडकर चौक,  झेंडीगेट, ता.जि. अहिल्यानगर हल्ली.रा. नागापुर,ता.जि.अहिल्यानगर टोळीसदस्य (२) अदिल अमीन कुरेशी, वय २०वर्ष रा. सदर बाजार,भिंगार,ता.जि.अहिल्यानगर, हल्ली रा. नागापुर, ता. जि. अहिल्यानगर व (३) शफिक नुर कुरेशी, वय ५०वर्ष रा. सदर बाजार,भिंगार,ता.जि.अहिल्यानगर, हल्ली रा. नागापुर, ता. जि. अहिल्यानगर यांना अहिल्यानगर जिल्हयातुन ०१ वर्षाकरीता हद्यपार केले बाबतचे आदेश श्री.सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी पारीत केले आहेत. अहिल्यानगर जिल्हयात संघटीतपणे गुन्हे करणा-या टोळीचा बिमोड करण्यासाठी जिल्हयातील शरीराविरुध्द व मालाविरुध्द, गोवंशीय कायदयान्वये तसेच भारतीय हत्यार कायदयान्वये गुन्हे करणाऱ्या गुन्हेगार इसमांची टोळीची माहिती संकलीत करुन त्यांचे विरुध्द हद्यपारीची कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच आणखी गुन्हेगारांचे टोळीची माहिती संकलीक करण्याचे काम चालु त्यांचे विरुध्दही हद्दपारीची कार्यवाही करणार असल्याचे संकेत मा.श्री.सोमनाथ घार्गे,  पोलीस अधीक्षक, तथा हद्दपार प्राधिकरण अहिल्यानगर यांनी दिलेले आहेत.

Post a Comment

0 Comments